वाढदिवसानिमित्ताने राजेंद्र सूर्यवंशी यांनी घेतले रक्तदान शिबीर
८६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
पंढरपूर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून राजेंद्र सूर्यवंशी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनच्या माध्यमातून आज 30 मे रोजी पंढरपूर कॉलेज चौकातील श्री पेट्रोलियम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार, तहसीलदार सुशील बेल्हेकर, युवा उद्योजक ओंकार सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, यांचा परिवार, नातेवाईक आणि राजेंद्र सूर्यवंशी या दानशूर उद्योजकावर प्रेम करणारे रक्तदाते उपस्थित होते.
"वाढदिवसाचा उत्सव साजरा न करता, अनावश्यक खर्चाला फाटा देत, रक्तदानासारखा उपक्रम राबवून राजेंद्र सूर्यवंशी यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे." अशा शब्दात चंद्रपुर आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत. तर "आज कोरोना महामारी च्या संकटकाळी बेड, ऑक्सिजन, याबरोबरच रक्तदानाची सुद्धा समाजाला खूप गरज असल्याने सूर्यवंशी यांचे काम कौतुकास्पद आहे" असे वक्तव्य तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून "राजेंद्र सूर्यवंशी यांच्यापासून समाजाने प्रेरणा घ्यावी" असे त्यांचे कार्य असल्याचे म्हटले आहे. "समाजाच्या उपयोगी पडता आले यासारखे मोठे भाग्य नाही त्यामुळेच वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे" सत्कारमूर्ती राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरात एकूण 86 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा