मोहिनी भागवत एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची सजावट
पंढरपूर ( प्रतिनिधी ) दिनांक :- २३ मे , महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात आज मोहिनी भागवत एकादशी निमित्त विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे . पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचुंदकर पाटील यांनी हि पुष्प सजावट विठ्ठल चरणी अर्पण केली आहे. मोगरा गुलाब झेंडू आणि आष्टर अशा फुलांची हि सजावट करण्यासाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च आला आहे. पुण्याच्या कुमार शिंदे फ्लॉवर डेकोरेटर्स या कंपनीने अतिशय सुंदर पुष्परचना केली असून . फुलांमुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गाभारा सुगंधात न्हाऊन निघाला आहे , तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनोहर दिसत आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा