maharashtra day, workers day, shivshahi news,

बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल - तहसीलदार करणार उपलब्ध बेडची खात्री

तहसीलदार करणार उपलब्ध बेडची खात्री.

तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना बॅड मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

covid-19, solapur, shivshahi news


सोलापूर -( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील तीव्र आणि अतितीव्र कोरोना ची लक्षणे असलेल्या रुग्णांना अनेक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये सेंटर निर्माण केले आहेत , त्या ठिकाणाची तपासणी करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत . कोरोना ची अतितीव्र तीव्र आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांसाठीच डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर मध्ये बेड उपलब्ध करून द्यावेत , अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र , अनेक हॉस्पिटल मध्ये विशिलबाजी बोकाळली आहे. तसेच ओळखीच्या आणि संबंधित लोकांना हॉस्पिटल काही बेड राखीव ठेवत असून , आलेल्या कुणाला बॅड शिल्लक नाहीत , असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल मधील उपलब्ध बीड आणि त्या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयातील खाटा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी वापरल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. ज्यांना गरज आहे त्यांना बेड उपलब्ध होत नसल्याने शहर जिल्ह्यातील खाटाची पडताळणी केली जाणार आहे. शहरातील हॉस्पिटल मधील खाटांची पडताळणी उपायुक्तमार्फत , तर ग्रामीण मधील खाटांची पडताळणी तहसीलदारांच्या पथकामार्फत केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल मध्ये चौदाशे , तर डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये अठराशे खाटा आहेत . तर 220 वेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र , मागील काही दिवसांपासून बेड उपलब्ध होत नसल्याने लक्षणे असलेल्या रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्या हॉस्पिटल मधील बॅड पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

 उपलब्ध बेडची होणार पडताळणी : शंभरकर

रुग्णालयात दाखल झालेल्या तीव्र आणि अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांनाच ऑक्सिजन व वेंटीलेटर वापरण्याची गरज असते . मात्र , अनेक ठिकाणी सौम्य लक्षणे असलेले रुग्णही उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे गरजूंना बॅड उपलब्ध होत नाहीत , असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर मधील खाटांची पडताळणी पथकाने द्वारे केली जाणार आहे. शहरात उपायुक्त , तर ग्रामीण मध्ये तहसीलदारांमार्फत ही तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !