पंढरपूर पं .स. उपसभापतीपदी भोसले बिनविरोध
उपसभापतीपदी राजश्री पंडितराव भोसले
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री पंडितराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे प्रशांत ( भैया ) देशमुख यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदावर बुधवारी राजश्री भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड प्रक्रिया तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेत करण्यात आली. सरकोली ( तालुका पंढरपूर ) पंचायत समिती गणातून राजश्री भोसले या निवडून आल्या आहेत.राजश्री भोसले यांनी यापूर्वी बाजार समितीचे उपसभापती म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे. तसेच विठ्ठल चे संचालक म्हणूनही काम केले आहे.
त्यांच्यावर आत्ता पंचायत समिती उपसभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे उर्वरित एक वर्ष उपसभापती म्हणून भोसले या काम पाहणार आहेत. पंचायत समिती सदस्य पदी निवड झाल्यानंतर चार वर्षे उत्कृष्ट काम केल्याने आमदार प्रशांत परिचारक यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी उपसभापती पदी निवड केली व काम करण्याची संधी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ करुन दाखवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाणी , आरोग्य , शिक्षण , रस्ते आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर राजश्री भोसले यांनी सांगितले. यावेळी सभापती अर्चना व्हरगर ,माजी सभापती दिनकर नाईक नवरे , राजेंद्र पाटील , अरुण घोलप , प्रशांत देशमुख , जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख , संतोष घोडके , प्रणव परिचारक , संभाजी शिंदे , गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , अर्चना पाटोळे , धोंडीराम मोठे , पंडितराव भोसले आदी उपस्थित होते. या निवडीनंतर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते नूतन उपसभापती राजश्री भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून संतोष मोरे यांनी काम पाहिले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा