घरगुती व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती
अजित पवारांचे निर्देश ; विरोधकांच्या रेट्यापुढे सरकार नरमले
मुंबई - ( प्रतिनिधी ) कृषी पंप आणि घरगुती वीज ग्राहकांच्या थकबाकी संदर्भात विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज कनेक्शन तोडू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले. राज्यातील वीजबिल थकबाकी संदर्भात अधिवेशन कालावधीतच विशेष बैठक आयोजित करून चर्चा करून यावर मार्ग काढला जाईल, अशी ग्वाहीही पवार यांनी विरोधकांना दिली.
सर्वसामान्य लोकांसह शेतकऱ्यांकडून वीज बिलाची सक्तीने वसूल करण्याबरोबरच, ज्यांनी बिले भरली नाही त्यांची वीज कनेक्शन तोडत असल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपच्या आमदारांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात विधिमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले. यानंतर विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडण्या वरून सरकारला धारेवर धरले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारला लक्ष केले.वीज तोडणी विरोधात विरोधक सभागृहाबाहेर आणि सभागृहातही आक्रमक झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडणी ला निर्णय होत नाही, तोपर्यंत स्थगिती देत असल्याचे सभागृहात जाहीर केले.राज्यातील वीज बिलाच्या थकबाकी संदर्भात विधिमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. वीजबिल थकबाकी संदर्भात या अधिवेशन कालावधीतच विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्यात येईल. वीज बिलाचा विषय हा ऊर्जा खात्याचा आहे. तरीही त्यावर सभागृहात चर्चा घेऊन दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान होत नाही आणि त्यावर निर्णय होत नाही तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही , अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहांना दिली.
50 लाख कनेक्शन तोडली
वीज तोडणी करून सरकार सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. आज वर पन्नास लाख वीज कनेक्शन तोडली आहेत. त्यामुळे तातडीने वीज कनेक्शन तोडणी थांबवावी , तसेच सोडलेल्या सर्व ग्राहकांची वीज जोडणी पुन्हा करून घ्यावी , अशी मागणी देवेंद्र फडवणीस यांनी केली. विधान परिषदेतही देवकर यांनी सरकारला लक्ष विज बिलावरून राज्य सरकार विरुद्ध जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे सरकारने कर्ज काढावे ; पण शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावीत , अशी मागणी केली प्रवीण दरेकर यांनी ज्यादा रकमेची काही बीलेच दाखवली
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा