बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
पनवेलच्या एकावर बार्शीत गुन्हा
![]() |
आमदार राजेंद्र राऊत |
बार्शी - ( प्रतिनिधी ) बार्शी येथील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही , अशी धमकी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार पनवेल येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदू उर्फ बाबा पाटील ( रा.पनवेल ) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आमदार राजेंद्र राऊत यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत खराडे ( रा. शिवाजी आखाडा , बार्शी ) यांनी फिर्याद दिली आहे. पनवेल येथील नंदू पाटील याने तीन मार्च रोजी फेसबुक लाईव्ह द्वारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत व नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून ,मी खूप हरामी माणूस आहे माझ्या वाघा दाढीच्या चेहऱ्यामागे जो चेहरा आहे , तो खूप कमी लोक ओळखतात. तुम्ही जर मुंबईला आलेले समजले तर तुम्हाला मुंबईत बाहेर पडू देणार नाही. माझे खूप भाई लोकांची संबंध आहेत. भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात आपण राजकारण कराल व त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे. मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे माझे खुले आव्हान आहे. मी बार्शी ते येऊन नंग्या तलवारी नाचवीन ,माझ्या विरोधात कितीही पोलिस यंत्रणा व तुमच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा लावली तरी माझ्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. तुमच्या सोबत दहा पोलीस जरी ठेवले तरी काही होणार नाही , अशा पद्धतीने बोलून नंदू पाटील जाने धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात नंदू उर्फ बाबा पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामराव गव्हाणे हे करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा