आता विना पास मिळणार विठुरायाचे दर्शन
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय
20 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी
vithhal rukmini mandire samiti
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनाकरिता जास्तीत जास्त भाविकांना सोडण्यात यावे, भाविकांना मुखदर्शन ना करता सोडण्यात येणार आहे.तसेच 20 जानेवारीपासून ऑनलाईन बुकिंग न करता केवळ आधार कार्ड दाखवून भाविकांना दर्शनाकरता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, संक्रांतीनिमित्त वाणवसा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
करोना च्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सतरा मार्चपासून दर्शनाकरता बंद ठेवण्यात आले होते.राज्य शासनाच्या आदेशानुसार दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दररोज किमान एक हजार भाविकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर सर्व नियम व अटी नुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्य दर्शनाकरता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे भाविका मधून स्वागत करण्यात आले.पाहता एक हजारावरुन संख्या दोन हजारावर गेली. यानंतर 2000 आवरून 4800 भाविकांना दर्शनाकरता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.भाविकांची मागणी लक्षात घेऊन सोमवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने बैठक घेऊन मंगळवार 12 जानेवारीपासून ऑनलाइन बुकिंगची संख्या वाढून 4800 वरून दररोज 8000 करण्यात आली आहे.यामुळे राज्यभरातून तसेच परराज्यातून आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.
ऑनलाईन बुकिंग करता येणाऱ्या भाविकांना 20 जानेवारीपासून वी नापास ओळखपत्र (आधार कार्ड) दाखवले तर थेट श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनाकरता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून एकही भाविक दर्शनापासून वंचित राहणार नाही.मंदिर समितीने आज मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीस सदस्य संभाजी शिंदे , ह.भ.प. ज्ञानेश्वर महारज जळगावकर , ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी सुरेश कदम आदी उपस्थित होते.
नियम व अटी कायम
65 वर्षापुढील व्यक्ती, दहा वर्षाखालील मुले,गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांना दर्शनाकरता प्रवेश देण्यात येणार नाही.थर्मल स्क्रीनिंग मध्ये आजारी असलेल्या व्यक्तींना देखील मंदिरात दर्शनाकरिता प्रवेश दिला जाणार नाही. याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आव्हानही मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. वाणवसा कार्यक्रम रद्द
13 व 14 रोजी संग मकर संक्रांत र होत आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात या सणाला रुक्मिणी मातेस वांवसा करण्यासाठी महिला भाविक येतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई आहे.त्यामुळे पदस्पर्श दर्शन खुले करण्यात आलेले नसल्याने या वर्षीचा मकरसंक्रांतीचा वांवसा करण्यास महिला भाविकांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र महिला भाविकांची मागणी विचारात घेता 14 रोजी कासार घाट येथून सायंकाळी 6 ते रात्री दहा या वेळेत विना बुकिंग 'श्री 'चे मुखदर्शन घेण्यासाठी सोडण्यात येणार आहे. वाढदिवसाचे साहित्य मंदिरात नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा