maharashtra day, workers day, shivshahi news,

जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

Gram Panchayat nivadnuk, Solapur, shivshahi news
ग्रामपंचायत निवडणुक २०२१


सोलापूर - (प्रतिनिधी) जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीसाठी उद्या दिनांक 15 रोजी मतदान होत असून , काल दिनांक 13 रोजी जाहीर प्रचाराची मुदत संपली आहे. उमेदवारांना आता जाहीरपणे प्रचार करता येणार नसला तरी सोशल मीडिया आणि वैयक्तिक भेटीगाठी द्वारे आता प्रचार सुरू आहे. या उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेटी मध्ये बंद होणार असून दिनांक 18 जानेवारी रोजी या निवडणुकांचे जाहीर होतील. 

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसापासून निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु होती प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या धामधुमीत होते. यावेळी ग्रामीण भागामध्ये प्रथमच पारंपारिक प्रचार पद्धतीबरोबरच आधुनिक साधनांचा म्हणजेच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. फेसबूक आणि व्हाट्सअप या माध्यमांचा प्रचारामध्ये सर्वाधिक वापर झाल्याचे दिसून आले. आपापल्या नेत्यांचे फोटो ,व्हिडिओ, आणि मीम्स कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शेअर केले. या निवडणुकीत तरुण उमेदवार आणि कार्यकर्ते यांचा उत्साहही वाखाणण्यासारखा होता तरुणाईचा राजकारणातील वावर हा ग्रामपंचायत निवडणुकांमधील उल्लेखनीय सकारात्मक बदल म्हणावा लागेल. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये तरुणांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग दिसून आला. 

जिल्ह्यात होत असलेल्या 658 ग्रामपंचायतींपैकी 54 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे आणि 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत मधून सहा हजार 301 जागांसाठी 14 हजार 38 उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये नव्या जुन्याची लढत होत असल्याने या निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत.

सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वतीनेही सर्व मतदारांना आम्ही विनंती करत आहोत कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतःहून घरातून बाहेर पडा आणि मतदान करा मतदान करणे हे आपले फक्त राष्ट्रीय कर्तव्य नसून आपले भविष्य घडवण्याचा एक मार्ग देखील आहे. 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !