maharashtra day, workers day, shivshahi news,

घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

सोलापूर पोलिसांची कौतुकास्पद कामगीरी; चौघांना अटक

दिल्लीहून येऊन सोलापुरात करीत होते चोरी

solapur police, great job, shivshahi news
solapur police

सोलापूर - ( प्रतिनिधी ) शहरात दिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेच्या वतीने पर्दाफाश करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक करून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख 21 हजारांचे दागिने, मोबाईल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे दिल्ली, उत्तर प्रदेश येथील असून तेथून सोलापुरात येऊन घरफोडी करत असल्याचे समोर आले आहे. शहरात जोडभावी पोलीस ठाणे व फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे फौजदार शैलेश खेडकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना जुना कारंबा नाका येथे रोडच्या कडेला up13 ए एन 5438 या क्रमांकाची सिल्वर रंगाची कार थांबली होती. त्यात चार जण गप्पा मारत बसले होते. ती कार परराज्यातील असल्याने त्याच्याकडे, सोलापुरात कसे काय आलात अशी विचारणा पोलिसांनी केली. त्यावेळी त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी सैफ अली महंमद अली सय्यद ( वय 26, राहणार उत्तर प्रदेश ), महंमद मुबाशिर अब्दुल अजीज शेख सिद्दीकी ( वय ४३,रा. दिल्ली ), तन्वीरअहमद जहीर अहमद अन्सारी ( वय 32, राहणार उत्तर प्रदेश ), महंमद शकील नूर अहमद तेली ( वय 44, राहणार उत्तर प्रदेश ) अशी सांगितली. 

   पोलिसांनी संशयावरून वरील चौघांची व त्याच्याकडे असलेल्या कारची झडती घेतली असता कारच्या क्लिनर साईटच्या शिफ्टमध्ये एक कटावणी व एक मारतूल मिळून आले. व प्लास्टिकच्या पिशवी चांदीचे दागिने आढळले. पोलिसांनी सखोल तपास केला असता शहरातील लोक हे त्यांच्या सोसायटीमध्ये वॉचमन ठेवत नाहीत. त्यामुळे या चौघांनी हायवेलगत असलेल्या द्वारका विहार मड्डी वस्ती, अवंती नगर, जुना पुना नाका, माकणे अपार्टमेंट, शेळगी तसेच डी -मार्ट जवळील बंद असलेल्या घरांची पाहणी करून कुलूप तोडून दिवसा चोरी केली होती. त्या चौघांनी यापूर्वी केलेल्या घरफोडीतील दागिने हे घरी ठेवल्याचे सांगितले. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. पोलिसांनी वरील चार आरोपींना 18 जानेवारी रोजी अटक केली व तपास कामी दिल्ली येथे जाऊन सोन्याचे दागिने जप्त केले. यावेळी पोलिसांनी त्या चौघा आरोपींना कडून सात तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाईल, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, असा सहा लाख 21 हजार 190 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

     

ही कामगिरी शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार शैलेश खेडकर, हवालदार अशोक लोखंडे, इनामदार कोतवाल पोलीस नाईक मुळे, चव्हाण, वाळके, जावळे, येळे व पथकाने पार पाडली ‌.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !