महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच नवीन अध्यक्ष
दिल्लीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक
नवे प्रदेशाध्यक्ष कोण ? उत्सुकता शिगेला
नवी दिल्ली - ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसला लवकरच नवीन तरुण चेहरा अध्यक्ष म्हणून मिळणार असल्याचे संकेत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. प्रभारी एच.के. पाटील यांनी शनिवारी दिल्लीत हि माहिती दिली. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल सुरू आहेत. अशातच बाळासाहेब थोरात यांच्या नंतर प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडी करता पक्षश्रेष्ठींच्या उपस्थित देशाच्या राजधानीतील पक्षांच्या मुख्यालयात मंथन झाले.
वडेट्टीवार इच्छुक
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. इतर दिग्गजही शर्यतीत आहेत.
नाना पटोले बाजी मारणार ?
दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा खुर्चीवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचे ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. पटोले ही विदर्भातील नेते आहेत ; परंतु 'पद असलेला प्रदेशाध्यक्ष नको ' असे संकेत खासदार बाळू धानोरकर यांनी दिले आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा फार काळ लांबल्याने बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठींनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.राज्याचे कॉंग्रेस प्रभारी एच. के. पाटील, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, के. सी. पाडवी, वर्षा गायकवाड, असलम शेख, विश्वजीत कदम तसेच अमित देशमुख बैठकीला उपस्थित होते. अधिकारी नियुक्तीचे अधिकार नाहीत तसेच काँग्रेस मंत्र्याचे ऐकले जात नसल्याचा नाराजीचा सूर बैठकीत काँग्रेस नेत्यांनी लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा