यापुढील निवडणुका स्वबळावर - भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख
भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
सोलापूर- ( प्रतिनिधी ) नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. या जोरावर आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली.solapur BJP
भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीची घोषणा शहरातील पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत द्वारे जाहीर केली. जिल्ह्यात भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वाधिक यश मिळाले आहे. जिल्ह्यात तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आले आहेत. सरपंच पदाची निवड झाल्यानंतर किती गावांमध्ये भाजपचे सरपंच आहेत, हे समजेल. याच बरोबर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली तर आपण ती निवडणूक लढवू , असेही देशमुख यांनी जाहीर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर मध्ये येऊन गेले असले तरी दुःखाच्या वेळी सांत्वन करण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवारी दिली तर ती जागा लढणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली. या नव्या कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंजुरी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यकारिणीत नव्या चेहर्यांना देखील संधी देण्यात आली आहे. या कार्यकारिणीत संघटना सरचिटणीस - शशिकांत चव्हाण ( मंगळवेढा ), धैर्यशील मोहिते-पाटील ( अकलूज ), सरचिटणीस - प्रतापराव पवार ( मोहोळ ), किरण बोकन ( करमाळा ), बादल सिंह ठाकुर ( पंढरपूर ), आप्पासाहेब बिराजदार ( अक्कलकोट ), उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर ( मंगळवेढा ), सुभाष मस्के ( पंढरपूर ), सोपान नारनवर ( माळशिरस ), केशव घोगरे (बार्शी ), पांडुरंग बचुटे ( मोहोळ ), संभाजी आलदर ( सांगोला ), भारत पाटील ( माढा ), रवी पाटील ( माळशिरस ), सुरेश आंबुरे (माढा ), गणेश भोसले उत्तर ( सोलापूर ), परमेश्वर यादवाड ( अक्कलकोट ), चिटणीस- धनंजय शिंदे ( पंढरपूर ), वैजंती देशपांडे ( सांगोला ), सिद्धेश्वर कोकरे ( मंगळवेढा ), डॉक्टर प्रतिभा व्यवहारे( मोहोळ ), अश्विनी भालेराव( करमाळा ),हैसप्पा शेंबडे ( मंगळवेढा ), महादेव पाटील ( दक्षिण सोलापूर ),अमरसिंह शेंडे( माढा ),संतोष मोगले ,कार्यालय प्रमुख सिद्धेश्वर गाडे, कोषाध्यक्ष-सुरेश पाटील, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख रमेश मोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे आदींची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा