सरपंच पदासाठी होणार सोडत
लोकसंख्येच्या प्रमाणात निघणार चिठ्ठीद्वारे आरक्षण
![]() |
sarpanch 2021 |
महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील नियम 3 अ व ब अन्वये तहसीलच्या एकूण लोकसंख्येशी त्या-त्या तहसील कार्यक्षेत्रातील अशा जातीच्या व जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नुसार हे आरक्षण काढण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी राखून ठेवावयाची सरपंचपदी त्या-त्या तहसील मध्ये असलेल्या सरपंचाच्या एकूण पदाच्या 27 टक्के प्रमाणे काढावी लागणार आहेत. त्यानुसारच तहसिलदारांना सरपंच आरक्षण सोडत काढावी लागणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी स्त्रियांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग या मध्येही स्त्रियांसाठी 50 टक्के आरक्षण राखून ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत . चिठ्ठ्या टाकून या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार असून यामध्ये अनुसूचित जातींसाठी 157, त्यापैकी 79 महिलांसाठी, तर 78 पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 278, त्यापैकी 139 महिला, तर 139 पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 576 जागा असून त्यापैकी महिला प्रवर्गासाठी 288 आणि पुरुष वर्गासाठी 288 जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.याचे आरक्षण सोडत येत्या 27 जानेवारी रोजी त्या-त्या तहसील कार्यालयात घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने या निवडणुकांमध्ये अधिक चुरस निर्माण झाली नव्हती. सदस्य निवडीनंतर हे आरक्षण जाहीर होणार असल्याने अनेकांचा निवडणुकीतील उत्साह कमी झाला होता. मात्र आताच निवडून आलेल्या सदस्यांमधून नेमके कोणाचे आरक्षण निघणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे येत्या 27 जानेवारीला कोणाला सरपंचपदाची लॉटरी लागणार, हे स्पष्ट होणार आहे..
गत 15 वर्षातील आरक्षण वरून सोडत
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये मागील पंधरा वर्षात ज्या जातीत प्रवर्गाचे आरक्षण झालेले आहे,त्या जाती प्रवर्गाचे आरक्षण वगळून उर्वरित राहिलेल्या जाती प्रवर्गाच्या चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार आहे.त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये कोणाचा आरक्षण पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा