रवि सोनार स्वरसम्राट - २०२० उपाधीने सन्मानित
![]() |
रवि सोनार यांचा सहकुटुंब सन्मान करताना कमलाकर सातपुते |
पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र संवाद न्यूजच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेल्या पार पडलेल्या स्वरसम्राट - २०२० या ऑनलाईन कराओके गीत गायन स्पर्धेत येथील उद्योजक असलेले सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी यांनी पार पडलेल्या सर्व फेरीअंती उद्योजक विभागात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र संवाद न्यूजच्या माध्यमातून संपन्न झालेल्या भव्य समारंभात आयोजकांच्या वतीने टिव्ही स्टार व मराठी चित्रपट अभिनेते मा. कमलाकर सातपुते यांच्या शुभहस्ते रवि सोनार यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर साहित्य - चित्रपट - सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे संपादक मा. दिगंबर भगरे, ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रकाशजी जडे तसेच इतरही अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी साहित्य व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे कवी रवि वसंत सोनार यांनी गायन क्षेत्रातही अल्पावधीतच यश संपादन केल्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा