पंढरपुरात शेतकऱ्याचे जगावेगळे आंदोलन - प्रशासनाची धावपळ
पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालय येथील टॉवरवर चढून शेतकऱ्याचे उपोषण.
![]() |
farmers protest at pandharpur |
पंढरपूर - प्रतिनिधी (कबीर देवकुळे ) जिल्हाधिकारी व न्यायालयाने हुकूमनाम्यामध्ये एक वादी व सहा प्रतिवादी असताना कुणाचा वाटप तक्ता तयार करण्याबाबत व नोंद देण्याबाबत आदेश केला होता. या आदेशाची नक्कल मिळावी, या मागणीसाठी पंढरपूर प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून कुबेर चिमाजी घाडगे (मु. पो. देगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर) या शेतकर्याने आमरण उपोषण सुरू केले आहे सोमवारी सकाळी शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे हे पंढरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे असलेल्या जवळपास १०० फूट टॉवरवर चढले आहेत, सोबत त्यांनी मोबाईल व पिशवी ठेवली आहे. अचानक शेतकरी टॉवरवर चढल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. तत्काळ तहसीलदार विवेक साळुंखे, सपोनि. राजेंद्र मुगदुम या ठिकाणी पोहोचले. प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी कुबेर चिमाजी घाडगे यांच्याशी उपोषण स्थगित करण्यासंदर्भात फोनद्वारे विनवणी केली. त्याचबरोबर सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त व अग्निशमन वाहन ठेवण्यात आले होते .
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा