एक लाख उत्पन्न असणाऱ्या सर्व नोकरदारांची रेशनकार्डे होणार रद्द
![]() |
Ration-Card |
या मोहिमेत प्रत्येक रेशन कार्डाची तपासणी होणार आहे. कार्डधारकांना कडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेतला जाणार आहे. या अर्जासोबत संबंधित कार्डधारकाला रहिवासी पुरावा जोडावे लागणार आहे. हा पुरावा एका वर्षातील असणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांची छाननी होणार आहे. पुरावा न जोडलेल्या कार्ड धारकांचा समावेश 'ब 'गटात होईल.या गटातील सर्व रेशनकार्ड रद्द केली जाणार आहेत. तपासणीदरम्यान दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती, मृत व्यक्ती यांची नावे तत्काळ कमी केली जाणार आहेत. यासह हत्या कार्ड वरील धान्याचे प्रमाणही कमी होणार आहे. ज्याठिकाणी संशयास्पद असेल, आशा कार्ड ची तपासणी करताना प्रसंगी पोलिसांची मदत घ्या, असे आदेशही अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांवरकाम करणारे आणि ज्ञात मार्गाने वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या यांची कार्डे तपासणीदरम्यान रद्द करा.कार्ड रद्द केल्यानंतर ज्यांना रेशन कार्ड हवे असेल त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत, त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना दे असणारे रेशन कार्ड उपलब्ध करून द्यावे, असेही आदेश दिले आहेत.या शोध मोहिमेमुळे अपात्र कार्डधारक मोठ्या संख्येने समोर येण्याची शक्यता आहे. ज्याचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे, त्यांना शुभ्र (पांढरे ) कार्ड दिले जाते. या शोध मोहिमेमुळे या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कार्ड शुभ्र होणार आहे.त्यांच्यासह शुभ्र कार्डधारकांची राज्यातील संख्या कितीतरी पटीने वाढणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा