पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार
उपाध्यक्षपदी विजय कांबळे, सचिवपदी सुरेश गायकवाड
![]() |
patrakar suraksha samiti,pandharpur |
पंढरपूर - प्रतिनिधी ( कबीर देवकुळे ) महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूरच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार, उपाध्यक्षपदी विजय कांबळे तर सचिवपदी सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. शुक्रवार दि. १ जानेवारी रोजी येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज मठामध्ये पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत या निवडी एकमताने घोषित करण्यात आल्या. संघाच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार, उपाध्यक्षपदी विजय कांबळे, सचिवपदी सुरेश गायकवाड, तर खजिनदारपदी श्रीनिवास उपळकर यांच्या निवडी करण्यात आल्या. या निवडीनंतर संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र सरवदे आणि संघाच्या वतीने नूतन सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
नूतन पदाधिकारी निवडीच्या संदर्भात झालेल्या पत्रकार सुरक्षा समितीच्या या बैठकीस, पत्रकार संघाचे मार्गदर्शक अविनाश साळुंखे ( दै.दामाजी एक्सप्रेस ), राधेश बाधले-पाटील ( संपादक सा. राष्ट्रसंत ), अपराजित सर्वगोड ( दै.एकमत ), चैतन्य उत्पात (गोफण न्यूज ), राजेश शिंदे ( दै. नवराष्ट्र ), दत्ताजी पाटील ( संपादक, सा.सत्यता ) यांचे सह कबीर देवकुळे, ( शिवशाही न्यूज ) ,बाहुबली जैन ( दै.सोलापूर भूषण ), अमोल गुरव ( दै. कटू सत्य ), मारुती वाघमोडे ( दै. एकमत ), भैरवनाथ कडाळे ( स्वराज न्यूज चॅनल ), राजेंद्र काळे ( दै. जनसत्य ), संजय यादव ( संपादक सा. पंढरी तडाका ), रामकृष्ण बिडकर ( संपादक सा.पंढरी संदेश ), पत्रकार प्रकाश सरताळे (दै.एकमत), रवी शेवडे (लोकप्रवाह न्यूज) विश्वास पाटील (दै. लोकवार्ता ) अमर कांबळे (सा. युवक आघाडी) आदी सदस्य उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा