बनावट नोटा तयार करणारी टोळी अटकेत
सांगली जिल्ह्यात कारवाई : माळशिरस मधील एकासह तिघे ताब्यात
![]() |
fake note |
सांगली- ( प्रतिनिधी ) 2000 आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. कुपवाड ( ता.मिरज ) येथील दत्तनगर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याकडून 90 हजारांच्या बनावट नोटा, कलर प्रिंटर, एलसीडी स्क्रीन,स्कॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित, गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजय बाळासाहेब कोळी ( वय ३३, सध्या रा. दत्तनगर, कुपवाड, मुळ रा. रेठरेधरण ) , शरद बापू हेडगे ( वय ३४,रा. संजय नगर, सांगली ) तेजस उर्फ भावड्या सूर्यकांत गोरे ( वय 23, रा. मोरोची,ता. माळशिरस, जि. सोलापूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अधीक्षक गेडाम यांनी चोरासह विविध गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी या कारवाईसाठी एक विशेष पथक तयार केले आहे. पथक शनिवारी कुपवाड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दत्तनगर येथे दोघेजण संशयास्पदरीत्या थांबले असून त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती निरीक्षक गायकवाड यांना खबरयाद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून विजय कोळी, शरद हेगडे यांना ताब्यात घेतले.त्यानंतर दोघांचीही झडती घेण्यात आली.हजाराच्या 29 तसेच दोनशेची एक बनावट नोट सापडली. त्याबाबत त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हेगडे याने या नोटा चलनात आणण्यासाठी दिल्याचे सांगितले. हेगडे यांनी या नोटा मोरोची (ता. माळशिरस ) येथील तेजस गोरे यांनी स्वतः तयार करून चलनात आणण्यासाठी दिल्याची कबुली दिली.त्यानंतर पथकाने मोरोची येथे छापा टाकून तेजस गोरे ला अटक केली. त्याच्याकडील एक एलसीडी स्क्रीन, कलर प्रिंटर, स्कॅनर जप्त करण्यात आला. तिघांकडून दोन हजाराच्या 45 तर 204 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार
यातील एक संशयित विजय कोळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. हेगडे आणि त्याच्यात गोरे नातेवाईक आहेत. तर हेगडे आणि कोळी पूर्वीपासून मित्र आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा