maharashtra day, workers day, shivshahi news,

परवानगी गृहीत धरून मानकऱ्यांची तयारी - सिद्धेश्वर यात्रा सोलापूर

  परवानगी गृहीत धरून मानकऱ्यांची  तयारी 

  सिद्धेश्वर यात्रा सोलापूर 

sidhheshwar mandir solapur, gaddaa yatra, shivshahi news
sidhheshwar mandir solapur

सिद्धेश्वर यात्रेस आजपासून प्रारंभ; निर्णयास प्रशासनाकडून विलंब


gaddaa, Siddeshwar yatra , solapur,  shevashahi news.
Siddeshwar

सोलापूर- (प्रतिनिधी) सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेला रविवारी (दि.१०) पासून सुरुवात होणार असून, शेटे वाड्यातील योगदंड पूजेने यात्रेचा धार्मिक विधीस प्रारंभ होईल. मात्र, यात्रे संदर्भात शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. सलग चार दिवस होणाऱ्या नंदीध्वज मिरवणूक परवानगी बाबतही स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याच सूचना देण्यात आल्या नसल्या तरी आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती नंदी ध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेतील धार्मिक विधीस शासनाने परवानगी दिली आहे. परंतु ; नंदी ध्वजाला देखील परवानगी मिळावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, महापालिका आयुक्त यांच्याकडे रीतसर प्रस्ताव पाठविला आहे.प्रत्यक्षात यात्रेला सुरुवात झाली असली तरी अद्याप शासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही आता शासनाने नंदीध्वजाला परवानगी दिली आहे असे समजून तयारीला लागलो आहे. नंदीध्वजचा शिवाय केवळ धार्मिक कार्यक्रम करून याचा सुरू करता येत नाही.ते आमच्या नियमातच बसत नसल्याचेही हिरेहब्बू यांनी सांगितले.कोरोनाचा विचार करून शासन परवानगी देण्यास विलंब लावत आहे. परंतु आम्ही सुरुवातीला लाखो भक्तांना मध्ये होणारी यात्रा हजारो, त्यानंतर आम्ही शेकडो भक्तावर आणली आहे. तरीही आमच्या परवानगीबाबत काहीच निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे आम्हाला परवानगी दिली जाईल, असे समजून आम्ही नंदीध्वज मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक नंदीध्वज यामध्ये किमान 100 फुटाचे अंतर असणार आहे. त्यामुळे कोरोनाबाबत आम्ही ही काळजी घेत आहोत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. भक्तांना देखील गर्दी न करण्याचे आव्हान आम्ही केल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. यावेळी रामेश्वर हिरेहब्बू , मनोज हिरेहब्बू , सागर हिरेहब्बू , सुदेश देशमुख, राजू देशमुख, विजय देशमुख, सोमनाथ मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, योगीनाथ कुरले, सुरेश मम्हाणे आदी उपस्थित होते.


यात्रेतील धार्मिक विधी
रविवार : शेटे वाड्यात योगदंड पूजन.
सोमवार : हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास साज चढवण्याचा कार्यक्रम.
मंगळवार : हिरेहब्बू वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा. नंदीध्वज मिरवणुकीस प्रारंभ. 68 लिंगांना यण्णीमंजन (तैलाभिषेक) . 
बुधवार : नंदीध्वज मिरवणुकीने अमृत लिंगा जवळ येतील. त्यानंतर अक्षता सोहळा.
गुरुवार : श्री सिद्ध रामेश्वराच्या योग दंडास करमुटगी स्नान, सायंकाळी मिरवणूक, नंदीध्वज आज नागफणी बांधणे, होम व भाकणूक.
शुक्रवार : शोभेचे दारूकाम होईल.
शनिवार :  यात्रेची कप्पडकळीने सांगता.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !