maharashtra day, workers day, shivshahi news,

स्वदेशी 'कोव्हिशिल्ड'च्या आपत्कालीन वापरास मंजुरी

स्वदेशी 'कोव्हिशिल्ड'च्या आपत्कालीन वापरास मंजुरी
विशेष तज्ञांच्या संमतीची लसीला सशर्त परवानगी

covishield, covid-19, shivshahi news,
covishield


नवी दिल्ली-(प्रतिनिधी) देशात आपत्कालीन स्थितीत कोरोना संसर्गावर लस वापरास तज्ञ समितीने सशर्त परवानगी दिली आहे. विशेषज्ञ समितीच्या बैठकीत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या 'कोव्हिशिल्ड' या लसीला भारतात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्वदेशी कोव्हिशिल्ड' ही लस आपत्कालीन स्थितीत वापरण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.  विशेष समितीच्या शिफारशी च्या आधारावर देशाचे औषध महानियंत्रक (डी.सी.जी.आय.) अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • नववर्षात देशवासियांना खुशखबर
  • 'डी सी जी आय' च्या मंजुरीनंतर देशाला मिळेल पहिली लस !
  • यापूर्वी अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया, कॅनडा या देशांमध्ये अशाच पद्धतीच्या लसिना मंजुरी देण्यात आली आहे.
 
आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी कागदपत्र आभावी बैठकीत निर्णय घेण्यात आला नव्हता. शुक्रवारी दुपारी बारा वाजता आठवड्यातील दुसऱ्यांदा यासंबंधी बैठक बोलावण्यात आली. बैठकीत सर्वप्रथम अमेरिकेतील औषध उत्पादक कंपनी 'फायझर'च्या लसी वर चर्चा करण्यात आली. तदनंतर 'सिरम' तसेच भारत बायोटेक-आय सी एम आर च्या स्वदेशी लस 'कोव्हाॅक्सिन' वर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लसीच्या परवानगीसाठी बनवण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या (सीईसी) बैठकीत वेगवेगळ्या विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक तसेच अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सर्व तज्ञांनी 'सिरम'च्या लसीला देशात आपत्कालीन वापरावर सशर्त सहमती दर्शवली. समितीतर्फे राष्ट्रीय औषध नियंत्रक (डीसीजीआय) यांच्याकडे 'कोव्हिशिल्ड' या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी देण्यात येत आहे, अशी शिफारस करण्यात आली आहे. अंतिम निर्णय' डीसीजीआय' देतील अशी माहिती समितील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शिफारशीच्या आधारे लस वापराची मंजुरी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समितीच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड विद्यापीठ तसेच अष्ट्राजेनेका कंपनीच्या सहकार्याने बनवण्यात आलेली 'कोव्हीशील्ड' भारताची पहिली लस म्हणून ओळखली जाईल. अद्याप लस वापरासंबंधी 'डीसीजीआय' कडून अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !