अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सोमवारपासुन मिळणार मदत
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
![]() |
विजय वडेट्टीवार |
काही दिवसापूर्वी परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला झोडपून काढले होते . या अतिवृष्टीने, आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले होते . हतबल झालेला शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला होता . मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री नेते मंडळींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी दौरे केले होते . दरम्यान मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते . परंतु ते शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थिती केली जात होता अखेर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मदत सोमवार पासून शेतकऱ्यांना वाटप करणार असे घोषित केले . त्यामुळे बळीराजाला थोडा आधार मिळाला आहे .
![]() |
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान |
अतिवृष्टीग्रस्तना शेती व घराच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवार दि . ९ पासून दिली जाणार आहे .संबंधितांच्या बँक खात्यात हि रक्क्म जमा होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली . शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईपोटी ५ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही ते म्हणाले . ऑक्टोबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे शेती व घराचे प्रचंड नुकसान झाले . ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत म्हणून दिवाळीपूर्वीच हि मदत दिली जाणार आहे . सोमवारपासून याचे वाटप केले जाईल . असे सांगून वडेट्टिवार म्हणाले कि ,राज्यात विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे . त्याची आचारसंहिता लागू झाली आहे .मात्र ,आपत्तीच्या मदत वाटपाला आचारसंहितेची अडचण नसते . यापूर्वीही अशी मदत देण्यात आली आहे . अतिवृष्टीच्या भरपाईसाठी एकूण १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे . त्यातील ५ हजार ५०० कोटी रुपये शेती व शेतघर ,पशुधन व मृतांच्या वारसांना भरपाईपोटी दिले जाणार आहेत . पश्चिम महाराष्ट्रातील ५७ हजार हेकटर , तर मराठवाड्यातील ४ लाख ९९हजार हेकटर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे . राज्याला केंद्राकडून तब्बल ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे .अतिवृष्टीच्या भरपाईच्या पैशांसाठी केंद्राला तीन पत्रे पाठवली आहेत . भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार
![]() |
उध्द्व ठाकरे |
५ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद
मदतीचे स्वरूप असे....
जिरायती, बागायतच्या नुकसानभरपाई पोटी प्रतिहेक्टर १० हजार रुपये (२ हेक्टर मर्यादा )
फळबागांसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये (२ हेक्टर मर्यादा)
पशुधन ,शेतघर व मृतांच्या वारसांना भरीव मदत .