विद्या बालन बनणार शेरनी ......!चित्रकरण सुरु
विद्या बालन हि चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री आहे . जाहिरात क्षेत्रातून या क्षेत्रात आलेल्या विद्याला चित्रपटात खरेतर उशिराच संधी मिळाली असली तरी तिने तिला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करून, आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे . परिणिता , मिशन मंगल , डर्टी पिक्चर ,कहाणी ,बेगम जान , भूलभुलैया आदी चित्रपटातून तिने केलेला अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले आहे. तिने चित्रपटाची निवड आणि भूमिका निवडताना स्वतःचे वेगळेपण तर जपले आहेच पण त्या भूमिका आपला अभिनय सिद्ध करता येईल अशाच निवडल्या आहेत . व्यावसायिक चित्रपटातही कलात्मकता जपत तिने आपल्या भूमिका साकारल्या आहेत . नुकताच तिचा शकुंतला देवी हा सिनेमा येऊन गेला हा चित्रपट एक बायोपिक होता यातील तिच्या भूमिकेचे जगभर कौतुक झाले होते . आताही ती एक शेरनी नावाचा नवीन चित्रपट करत आहे
![]() |
vidya balan |
मागील काही महिन्यापासून कारोंनाने सगळे जग थांबवले आहे. तब्बल ६ महिन्याच्या विश्राती नंतर आता कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा एकदा करमणूक जगातील हालचाली वेगाने वाढल्या आहेत .चित्रपटगृहे खुली होण्याच्या मार्गावर आहेत . तर रखडलेली चित्रकरणे पुन्हा एकदा सुरु झाली आहेत . दरम्यान ,बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालननेही पुन्हा एकदा चित्रकरण सुरु केले आहे .तिची सेटवरील काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत . यामध्ये सर्व लोक कोरोनाचे नियम पाळून काम करत असल्याचे दिसत आहे .
![]() |
vidya balan |
विद्या बालनच्या आगामी शेरनी या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशात करण्यात येत आहे . तसे पाहिल्यास शेरणी च्या चित्रीकरणास गेल्या मार्च मध्ये सुरुवात होणार होती. मात्र कॉरोना मुळे लॉक डाऊन लागू करण्यात आले आणि हे चित्रीकरण थांबले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित मसुरकर हे करत आहेत . शेरनी ची कथा मानव आणि जंगली जीव यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. म्हणूनच या चित्रपटाचे चित्रीकरण जंगलात करण्यात येत आहे .
शकुंतला देवी हा यापूर्वीच विद्या चा चित्रपट होय हा चित्रपट अमेझॉन प्राइम वर रिलीज करण्यात आला होता. थेट ओटीपी प्लॅटफॉर्म वर रिलीज होणारा विद्या चा हा पहिलाच चित्रपट होता.. या बाबत विद्या ने म्हटले होते कि , डिजिटल प्लॅटफॉर्म वर चित्रपट रिलीज केल्याने दबाव कमी होत नाही. तेथे हि नर्व्हसनेस आणि एकसाइटमेन्ट चा अनुभव हा येतोच . विद्या बालन ला शेरणीकडून मोठ्या अपेक्षा आहेत