अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी मतदान होणार
महासत्तेच्या महासंग्रामावर जगाचे लक्ष
american election |
सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आमने सामने आहेत . अमेरिकेच्या अध्यक्ष पदासाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यासाठीची सर्व सज्जता करण्यात आली आहे जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्ष पदासाठी होणारी निवडणूक नेहमीच जगभर गाजत असते .तसेच या निवडणुकीवरच जगाचे राजकारण ठरणार असल्याने, संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकड़े लागलेले असते . दर चार वर्षांनी अमेरिकेची निवडणूक होत असते . या निवडणुकीत सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी कडवे आव्हान ठेवले आहे . या पार्श्वभूमीवर हि निवडणूक होत असून साऱ्या जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे . प्रचारासाठी दोन्ही उमेदवारांनी रॅली वर जोर दिला आहे . कोरोना, चीनचा वर्चस्ववाद , भारत अमेरिका संबंध, तसेच एच. वन बी. व्हिसा आणि वर्णद्वेषाचे राजकारण हे मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारात कळीचे मुद्दे ठरले आहेत.
![]() |
joe biden |
अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेनुसार अर्ली वोटिंग मध्ये पाऊणे दहा कोटी मतदारांनी मतदान केले आहे. मागील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हिलरी क्लिंटन यांचे आव्हान होते. त्या निवडणुकीत ट्रम्प यांनी बाजी मारली होती, आणि अमेरिकेचा आजवरचा इतिहास पाहता बहुतेक विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी दुसऱ्याही निवडणुकीत विजय मिळवला आहे . अमेरिकेत एका व्यक्तीस फक्त दोनदाच अध्यक्ष होता येते . त्यामुळे सलग दोनदा अध्यक्ष झालेल्या व्यक्तीस पुन्हा निवडणूक लढवता येत नाही . आणि अमेरिकन जनतेने अनेकदा विद्यमान अध्यक्षाना दुसरी संधी दिलेली आहे. हा इतिहास पाहता, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर ,ज्यो बायडेन यांचे मोठे आव्हान असले तरी ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होण्याची सुद्धा दाट श्यक्यता आहे . एकंदरीत जागतिक महासत्तेच्या सत्तेचा लगाम अमेरिकन जनता कोणाच्या हत्ती देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
![]() |
donald trump |
#americadecides #americanelection #donaldtrump #joebiden #marathinews