कन्यादान हे सर्व श्रेष्ठ दान : कंगना राणावत
 |
कन्यादान- कंगना राणावत |
कंगना राणावत आपल्या अभिनयाने जेवढी चर्चेत असते त्यापेक्षा जास्त ती तिच्या वागण्या बोलण्याने आहे. क्वीन, मनकर्णिका, तनु वेड्स मनू अश्या चित्रपटातून एकापेक्षा एक सरस भूमिका करून तिने चित्रपट रसिकांबरोबरच समीक्षकांची माने सुद्धा जिंकली आहेत तिचा अभिनय अप्रतिम आहे . कंगणा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते त्यामुळे तिचे फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे तसेच ती समाजातील प्रत्येक घटनेवर तिचे मत नोंदवते हे मत नोंदवताना तिच्या बोल्ड स्वभावानुसार ती कोणताही आडपडदा ठेवत नाही त्यामुळे तिचे बऱ्याच वेळा कौतुक होते तर अनेक वेळा तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तरीही कंगनाने कधीच त्याची तमा बाळगली नाही . सुशांतसिंग राजापूरच्या मृत्यूनंतर तिने केलेल्या वक्तव्याने बरेच रामायण घडलेले आपण पहिले . तिने थेट सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाशी पंगा घेतला होता
 |
कंगना राणावत |
कंगना जशी सोशल आहे तशीच ती कुटुंब वत्सल सुद्धा आहे अलीकडच्या काळात ती तिच्या कुटुंबासह वेळ घालवत आहे आणि नुकतेच तिच्या घरी एक शुभकार्याची पार पडले. कंगनाची भाऊ कारण याचे नुकतेच लग्न झाले आहे. या लग्नाचे बरेच फोटो आणि काही व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत . तिच्या होणाऱ्या वाहिनीच्या आई वडिलांनी जेव्हा मुलीचे कन्यादान केले तेव्हा कंगना फारच भावुक झाल्याचे कळते
 |
haladi
|
कंगना रणोतच्या घरात गेल्या काही दिवसापासून लग्नाची धामधूम सुरु आहे . तिच्या भावाच्या हळदीचे वगैरे फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले होते . आता तिचा भाऊ करणंचे लग्न झाले असून त्याचा एक व्हिडीओ कंगनाने शेयर केला आहे . त्याचबरोबर तिने आपल्या वाहिनीसाठी भावुक पोस्ट लिहली असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे म्हटले आहे . कंगनाने म्हटले आहे की ,करणं आणि अंजलीला आशीर्वाद द्या . आज आमच्या घरी आमची मुलगी अली आहे . मात्र ,जेव्हा मी अंजलीच्या आई - वडिलांच्या विचार करते त्यावेळी मला गहिवरून येते . आज त्यांचं घर रिकामं रिकामं झालं असेल ,त्यांनी त्यांच्या काळजाचा तुकडा काढून आम्हाला दिला आहे . आज त्यांच्या मुलीची खोली रिकामी झाली आहे .कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही !
 |
कंगना राणावत |
कंगनाला रंगोली चंडेला ही मोठी बहिण आणि करण हा धाकटा भाऊ आहे . रंगोली ही कंगनाची व्यवस्थपक म्हणूनही काम करते .कंगनाने भावाच्या लग्नसमारंभातील काही विधीचे फोटो व व्हिडीओ ही यापूर्वी शेयर केले होते . सध्या ती आपल्या कुटूंबियांसमवेत हिमाचल प्रदेशातच आहे . काही दिवसापूर्वीच तिने जयललिता यांचा जीवनावरील ' थलायवी ' या चित्रपटाच्या शुटींगचा हैदराबादमधील उर्वरित भाग पूर्ण केला आहे .
 |
kangana as jaylaalita in thalaivi
|