सज्जनगडावरील मालमत्ता संस्थानला द्या , समर्थ सेवा मंडळाने देणग्यांचा तपशील द्यावा ; - न्यायालयाचा आदेश .
court justice |
सातारा : सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या दाव्याचा न्यायालयात नुकताच निकाल लागला आहे . सज्जनगडावर जमवलेली सर्व स्थावर मालमत्ता समर्थ सेवा मंडळाने संस्थानच्या ताब्यात द्यावी, आदेश येथील न्यायालयाने निकालात दिला आहे .
shri ramdas swami sansthan sajjangadh
सेवा मंडळाने संस्थांनचे प्रतिनिधी म्हणून निधी गोळा करून संस्थानच्या सज्जनगड येथील मिळकतीमध्ये इमारती बांधून स्वतःचा मालकी हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता . सज्जनगड देवस्थान संस्थांनच्या मालकी हक्कातील असताना स्वतःची समांतर व्यवस्था निर्मांण करून देणग्या गोळा केल्या .संस्थांचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे असताना गैरफायदा करून घेतल्याने प्रतिनिधीपद रद्द करावे व मिळकतीचा कब्जा , हिशोब ,रकमा व ताकीद मागणीसाठी श्री रामदासस्वामी संस्थांनच्या वतीने विश्वस्त सु . ग . स्वामी आणि इतरांनी श्रीसमर्थ सेवा मंडळ आणि त्यांचे मार्गदर्शक, विश्वस्थ यांच्या विरोधात २००३ मध्ये दावा दाखल केला होता . या दाव्याचा निकाल नुकताच लागला आहे . त्यांनुसार श्री समर्थ सेवा मंडळाने व इतर प्रतिवादींनी श्री रामदास स्वामी संस्थांनच्या दाव्यातील सज्जनगडावरील सर्व मालमत्ता संस्थांनचा ताब्यात द्याव्यात ,श्री समर्थ सेवा मंडळ व इतर प्रतिवादींनी १९५९पासुंन मिळालेल्या देणग्या , बांधलेल्या स्थावर मालमत्ता आणि व्याज याचा तपशील संस्थानला द्यावा .
![]() |
shri ramdas swami |
सेवा मंडळ व इतर प्रतिवादींनी सज्जनगडावरील श्री रामदास स्वामी संस्थान आणि सज्जनगडावरील देवस्थान यांच्या जागेत पूजा ,उत्सव ,यात्रा ,नैवेद्यासाठी जमा केलेला निधी व देणग्या व त्यावरील व्याजाचा तपशील संस्थानला द्यावा . याप्रमाणे देय असलेल्या रकमा ताबडतोब संस्थानला वर्ग करण्याची जबाबदारी वैयक्तिक व सामूहिकरीत्या सेवा मंडळ व इतर प्रतिवादींची आहे .संबंधित रकमांचा हिशेब दिला नाही, तर त्यासाठी कोर्ट कमिशन नेमण्यात यावे आणि त्याचा खर्च संबंधीतांकडून वसूल करावा . फिर्यादींनी नमूद केलेली रक्कम तीन कोटी २५ लाख व ५० लाख रुपये दाव्यात अंतिम हुकूमनामा होईपर्यंत काढून घेऊ नये आणि हस्तांतर करू नये . श्री समर्थ सेवा मंडळाने स्वताः,त्यांचे नोकर ,आणि इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत श्री रामदास स्वामी संस्थांनचे प्रतिनिधी म्हणून निधी संकलन करू नये ,असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे . संस्थांनच्या वतीने ऍड . श्यामप्रसाद बेगमपुरे यांनी काम पहिले . दरम्यान ,या निर्णयाच्या विरोधात अपील करणार असल्याबाबत अर्ज न्यायालयात दाखल केला असुंन ,अपील कालावधीपर्यंत हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीस न्यायालयाने स्थगिती दिली आहे .