मंदिर , प्रार्थानास्थळे खुली नियम,शिस्तीचे काटेकोर पालन करा :मुख्यमंत्री
CM Udhhav Thakare |
लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली राज्यातील मंदिरे व सर्वधर्मियांची प्रार्थानास्थळे सोमवार (दि. १६) पासून म्हंणजे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली आहेत . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ही घोषणा केली . मंदिरात प्रार्थानास्थळात शिस्त आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.राज्यातील मंदिरे व प्रार्थानास्थळे मार्च महिन्यापासून बंद होती . मंदिरे व प्रार्थानास्थळे उघडण्यात यावीत यासाठी जनतेतून वारंवार मागणी केली जात होती. काही राजकीय पक्षानी अंदोलनेही केली. मात्र ,सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मंदिरे व प्रार्थानास्थळे बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले होते .
बेसावध राहून चालणार नाही.
आता सोमवारपासून मंदिरासह सर्वधर्मियांची प्रार्थानास्थळे पूर्ववत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरु झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान व नरकासुररूपी कारीट फोडले असेल तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. यामुळेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रची स्थिती हाताबाहेर गेली नाही., असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
![]() |
vithhal mandir pandharpur |
मंदिर ,प्रार्थानास्थळे मास्कची सक्ती
महाराष्ट्रवर साधुसंतांची,देवदेवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त व सावधगिरी म्हणून होळी,गणेशउत्सव,नवरात्र,पंढरीची वारी झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद,माऊंट मेरीसारख्या जत्रासंदर्भात शिस्त पाळली आहे. आता दिवाळी पाडव्याच्या मुहूतावर मंदिरासह सर्वधर्मियांची प्रार्थानास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ही श्रीची इच्छा समाज,मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो; पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थानास्थळे उघडतील . आपण शिस्त पाळली तरच देवाचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील,असेही मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.
![]() |
god = doctors&police |
देव काळजी घेत होते.
या काळात सर्वच प्रार्थानास्थळे बंद असली तरीडॉ. ,परिचारिका,वॊर्डबॉयच्या रूपाने देव पांढऱ्या कपड्यात भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते.असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करा
मंदिर व प्रार्थानास्थळे उघडल्यावर सर्वानी शिस्तीचे काटेकोर पालन करावे. मुख्य म्हणजे प्रार्थानास्थळातील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करा. असेही मुख्यमंत्र्यानी यांनी म्हटले आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यातील मंदिरे बंद आहेत राज्यातील मंदिरे आणि सर्वधर्मियांची प्रार्थानास्थळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून बंद आहेत. कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर १८मार्च पासून बंद आहे. याच दरम्यान राज्यभरातील मंदिरे व प्रार्थानास्थळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बंद करण्यात आली होती