रणवीर -आलीया ब्रम्हास्त्र मध्ये व्यस्त
सुमारे आठ महिन्यानंतर दिगदर्शक अयान मुखर्जी हे ब्रम्हास्त्र च्या निमित्याने आपले योद्धे रणवीर कपूर आलिया भट्ट ,मौनी रॉय व नागार्जुन अक्किनेनी यांच्यासह पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत . ब्रम्हास्त्र या आगामी चित्रपटाचे सुमारे १० ते १२ दिवसाचे चित्रीकरण बाकी आहे . यासाठी निर्मात्यांनी मुंबईतच एक भव्य सेट उभा केला आहे . देशात कोरोनाचा प्रकोप सुरु होण्यापूर्वी ब्रम्हास्त्र चे चित्रीकरण मुंबईतच सुरु होते . महानायक अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटातील आपले चित्रीकरण यापूर्वीच पूर्ण केले आहे . त्यानंतर अवघ्या दीड ते दोन आठवड्यांचे चित्रीकरण बाकी असताना कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला . यामुळे उर्वरित चित्रीकरण थांबवण्यात आले
![]() |
aliya bhatt & ranveer kapoor- brahmastra |
सुरवातीपासूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या ना त्या कारणातून उशीर होत होता .त्यात लॉकडाऊनची भर पडली . असेही म्हंटले जात आहे की ब्रम्हास्त्र मधील दोन गाण्याचे शुटींग अद्याप बाकी आहे . हि गाणी रणवीर कपूर आणि आलीय भट्ट यांच्यावर चित्रित केली जाणार आहेत . कोरोनामुळे सरकारने लागू केलेल्या नियमामुळे हि गाणी यापूर्वी योग्यरीत्या चित्रित केली गेली नसती . यामुळेच आता हि गाणी येत्या जानेवारीत चित्रित करण्यात येणार आहेत . जावेळी देशात थिएटर सुरु होतील आणि प्रेक्षक जमू लागतील , तेव्हाच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.