ब्लास्टिंगच्या हादऱ्याने बळी गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पश्चिम भागातील मौजे एकसर येथील ग्रामस्थ मुकुटराव घाडगे वय ६५ यांचा ब्लॅक जेम्स स्टोन क्रेशर परिसरामध्ये संशयस्पद मृत्यु झाला आहे. मृत्यू झाल्याची माहिती समजतास ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. त्याठिकाणी असणारी परिस्थिती पाहता घाडगे यांच्या डोक्याला मार लागलेला होता. नाकातून तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून येत होते. जमिनीवर पडलेल्या अवस्थेत असणारे घाडगे यांचे शरीर होते. या परिसरात ब्लॅक जेम स्टोन क्रशर यांचे सततचे ब्लास्टिंग होत असते. या ब्लास्टिंगचा आवाज व हादरा इतका मोठा असतो की परिसरातील अनेक घरांना हादरे बसतात.
काल सुद्धा दिवसभरामध्ये अनेक वेळा ब्लास्टिंग झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या ब्लास्टिंगमुळेच दगड लागून किंवा पाय घसरून घाडगे हे पडले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. घाडगे यांचा मृत्यू कड्यातून पडून झालेला नाही तो सपाटीच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे ब्लास्टिंग मुळे त्यांचा पाय घसरल्याचा किंवा ब्लास्टिंग मुळे उडालेला दगड डोक्यात लागल्याचा प्राथमिक संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
ब्लॅक जेम टोन क्रशर परिसरातील एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे येणाऱ्या काळामध्ये या क्रशरमुळे अजून ग्रामस्थांना किती अडचणींना सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














