उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई स्वच्छता चषक स्पर्धा 2025-26 अंतर्गत ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. तसेच प्रमुख उपस्थितीत व पारितोषिक वितरण वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते करण्यात आले.
उपक्रमात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, ग्रामविकास, नागरिकांचा सहभाग, पर्यावरण जतन आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वाई तालुक्यातील वयगाव, परखंदी, वेळे, बोपर्डी, खडकी तसेच इतर ग्रामपंचायतींना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
समारंभात ग्रामपंचायतींच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून स्वच्छ, निरोगी आणि आदर्श गाव उभारण्याच्या दिशेने ग्रामस्थांनी केलेल्या कार्याची मंत्री पाटील यांनी प्रशंसा केली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमामुळे गावांच्या विकासाला नवे बळ मिळत असल्याचे सांगत भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














