धनुर्विद्येत सुवर्ण विजयाने वेलंगच्या मानात भर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाशीम जिल्हा क्रीडा संकुल, वाशीम येथे दि. ४ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या २२ व्या ज्युनियर राज्य धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा आणि मुळचा वेलंग गावचा सुपुत्र सार्थक जाधव याने आपल्या अचूक नेमबाजीच्या बळावर सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राज्य पटलावर झळाळी आणली.
ओम श्री सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन, वाई येथील खेळाडू असलेल्या सार्थकला कोच प्रणित सुतार यांचे कुशल प्रशिक्षण लाभले आहे. स्पर्धेत दाखवलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने सार्थकने सातारा जिल्ह्याची प्रतिष्ठा अधिक उंचावत वेलंग गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सुवर्ण विजयाबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र ननावरे यांनी सार्थकचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो निश्चितच उज्वल कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सार्थकच्या तेजस्वी यशामुळे धनुर्विद्या क्रीडा क्षेत्रात साताऱ्याचे नाव पुन्हा एकदा दिमाखात झळकले असून, त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














