नागरिकांमध्ये संताप, पोलिस प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरात मागील काही दिवसांपासून शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांकडून मोटारसायकलींची बेकायदेशीर, बेधडक आणि धोकादायक वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर येत आहे. शाळेच्या वेळेत तसेच सुट्टीच्या सुमारास अनेक मुलं परवाना नसताना तसेच वाहतूक नियमांचा कोणताही विचार न करता मोठ्या वेगाने वाहने चालवत असल्यामुळे अपघातांची भीषण शक्यता वाई शहरासह तालुक्यात वाढली आहे.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर आणि शाळेजवळ कॉलेज ट्रिपल-सीट, नो-हेल्मेट, ओव्हरस्पीडिंग ही धोकादायक चित्रे दिवसाढवळ्या दिसत असून याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वयोमानाने अल्प असताना गंभीर जबाबदारीची आवश्यकता असलेल्या वाहनांवर मुलं मोकाटपणे फिरत असताना पोलीस प्रशासनाची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
स्थानिक नागरिक आणि पालकांनी याविषयी चिंता व्यक्त करत सांगितले की, “अल्पवयीनांकडून होणाऱ्या या बेफिकीर वाहनचालकामुळे कधीही मोठे अपघात होऊ शकतात. तरीही पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने परिस्थिती गंभीर बनत आहेa. याबाबत शहरात दबक्या आवाजात चर्चा असून, वाई पोलिस प्रशासनाने अशा थिरकणाऱ्या तरुणांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, वाहने जप्त करावीत, पालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














