प्रशासनाचे मात्र या रस्त्याकडे क्षम्य दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील भद्रेश्वर पुलाजवळील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर साचलेल्या माती आणि खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार सातत्याने घसरून पडत आहेत. हा रस्ता नागरिकांसाठी मोठा धोका बनला असतानाही, संबंधित प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
पुलाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड जमा झाले आहेत. त्यात अजून भर म्हणून की काय की रस्त्याच्या दुतर्फा वाहणारे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला आहे, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा भाग धोकादायक बनला आहे.
परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज किमान एकतरी दुचाकीस्वार घसरून पडत आहे. यामुळे अनेकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्या आहेत. रस्त्याच्या मध्यभागी माती आणि चिखल साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देताना अपघात होण्याची भीती वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि अपघातग्रस्त लोकांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. "या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून रोलिंग करणे आणि साचलेली माती काढणे आवश्यक आहे. प्रशासनाने मोठ्या अपघाताची वाट न पाहता त्वरित पाऊले उचलावीत," अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक दुकानदाराने व्यक्त केली. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














