शिक्षण क्षेत्रात उल्लेखणीय व विशेष कार्याचा गौरव
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
देवगांव (रं) ता कन्नड येथील श्रीराम गणेश कनिष्ठ महाविद्यालयातील गणित विषयाचे प्राध्यापक डॉ राजेंद्र नेवगे यांना यावर्षीच्या राष्ट्रीय दर्पण पुरस्काराने नाशिक येथे नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त यावर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखणीय व विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव राष्ट्रीय दर्पण पुरस्कार समारंभात रोटरी क्लब नाशिक येथे करण्यात आला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच राजस्थान, मध्यप्रदेश आदी ठिकाणच्या शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये प्रा नेवगे हे एक होते. डॉ नेवगे यांना आतापर्यंत जवळपास 2 आंतरराष्ट्रीय, 16 राष्ट्रीय तर 10 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.नुकतीच दिल्ली विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टर पदवीने सन्मानित केलेले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर अतिउच्च समजणाऱ्या ग्लोबल मॅगझीनमध्येही त्यांना जून 25 च्या अंकात सन्मान मिळाला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषधी प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवाळ, सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष शाळा सुरक्षा समिती नाशिक श्री दिपक धोळकीया, समाजसेवक-निसर्ग व पर्यावरण संरक्षक धुळे पदमश्री श्रीराम चैत्राम पवार, बी वाय के महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ लीना भट, संचालक एम ए बी एव्हिशन कंपनी मुंबई श्री मंदार भारदे, संस्थापक अध्यक्ष दिनेश भागीरथी भोईर समाज प्रतिष्ठान सगरी दिनेश भोईर, संस्थापक अध्यक्ष महावीर इंटरनॅशनल नाशिक श्रीराम अनिल नहार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न झाला. डॉ नेवगे यांच्या या पुरस्कारामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रकाश भांडवलदार, अध्यक्ष एल डी भांडवलदार, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बांधव तसेच अंधानेर जन्मभूमी मित्र मंडळ सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














