कोंढावळे गावाचा मान उंचावणारी भरारी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिदुर्गम कोंढावळे गावचा सुपुत्र कु. नितीन अंकुश कोंढाळकर यांची २२ मराठा बटालियन एनसीसी सातारा अंतर्गत भारतीय विद्यापीठ, पाचगणी येथे असोसिएट एनसीसी अधिकारी (ANO) म्हणून नियुक्ती झाल्याने संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे. गावाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवणारी ही गौरवशाली नेमणूक असल्याने कोंढावळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
या यशानिमित्त गावकऱ्यांच्यावतीने विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नितीन यांची ही नेमणूक केवळ कोंढावळे गावासाठीच नव्हे, तर त्यांनी किसनवीर महाविद्यालय येथे एनसीसी प्रशिक्षण घेतले आहे समीर पवार सर यांचे ते विद्यार्थी आहेत त्यांची नियुक्ती ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. ते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नवघरे यांचे लहान मेव्हणे आहेत व अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत लहान वयात वडिलांचे छत्र हरपले, तरीही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर नितीन यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिद्द, चिकाटी आणि स्वबळावर वाटचाल करणारा एक प्रेरणादायी युवक म्हणून समाजात त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
जाणकारांनी त्यांच्या या यशाबद्दल मत व्यक्त करताना म्हटले की, "नितीन यांची घेतलेली उंच भरारी त्यांच्या भावी आयुष्यासाठी निश्चितच सुखद आणि प्रेरणादायी प्रवास ठरणारी आहे." कोंढावळे गावाचे नाव राज्याच्या पातळीवर उंचावणाऱ्या नितीन यांचे विविध स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे.





