बदनामीस कंटाळून महिलेने केली तक्रार
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
इन्स्टाग्रामवर महिलाच्या नावे बनावट खाते तयार करुन इतर महिलांना अश्लील चॅटींग करणारा सायबर पोलीसांच्या ताब्यात.छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलीस ठाणे यांची कामगीरी.
दि.13/10/2025 रोजी महिला तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुरनं क्र 08/2025 कलम 66(C) आयटी ऍ़क्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदार महिलेचे फोटोचा वापर करुन बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले व इतर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन तक्रारदार महिला असल्याचे भासवत त्यांच्या सोबत अश्लील संभाषण करायचा. त्यावरुन फिर्यादी महिलेने इन्स्टाग्रामवर होणाऱ्या बदनामीस कंटाळुन सायबर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करतांना पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे व पथकाने तपास करुन सदर बनावट इन्स्टाग्राम खात्याची माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रीक विश्लेषण करता, त्यामध्ये आरोपी जलील शहा खलील इनामदार रा.भऊर ता.वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांने त्याचे बहीनीचे मोबाईलवर ओटीपी घेवुन त्याचे स्वत:चे मोबाईल मध्ये बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तो तक्रारदार महिलेच्या नावाचा व फोटोचा वापर करत होता. त्यावरून सदर इसमास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोन मध्ये महिलेच्या नावाचे /फोटोचे इन्स्टाग्राम खाते दिसुन आले तसेच त्यानेच सदर बनावट खाते तयार केल्याची कबुली दिली असल्याने आरोपी विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथक नेमुण सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, सफौ कैलास कामठे, दत्ता तरटे, सविता जायभाये, मुकेश वाघ, योगेश तरमळे, राजेश राठोड, सायबर पोलीस ठाणे यांनी यशस्वी केली
सायबर गुन्हयापासुन सावध रहा, कोणत्याही अनोळखी व्यक्ती संशयास्पद संदेशावर विश्वास ठेवु नका.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














