मांजा विक्रेत्यावर कार्यवाही करून 2600 रुपयाचा माल हस्तगत
शिवशाही वृत्तसेवा वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर येथे lcb टीम ने मांजा विक्रेत्यावर कार्यवाही करून 2600 रुपयाचा माल हस्तगत करून मांजा विक्रेत्यावर कार्यवाही करण्यात आली.
दि.09/12/2025 रोजी गोपनीय बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ईसम नामे फारुख मोहम्मद शेख राहणार दर्गा बेस गफूर मजीत समोर वैजापूर येथे बंदी असलेला नायलॉन चायनीज मांजा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगतात मिळुन आला.वरुन छापा कारवाई करुन प्रतिबंधीत असलेला नायलॉन मांजा एकुण 3 तीन प्लास्टिक चक्री व एक लाकडी चक्री लाकडी चक्री एकुन किंमत 2600/- चा माल मिळुन आल्या वरून नमूद इस्म विरुद्ध पोस्ट वैजापूर येथे कलम 223,BNS व सह कलम 5 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हि कार्यवाही API इंगळे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, अशोक वाघ,शिवानंद बंनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात,संजय तांदळे व महिला पोलीस अंमलदार भंडारे यांनी केली.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














