कवठे गावावर पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
कवठे ता. वाई येथील विठ्ठल सदाशिव भागवत वय 85 यांचे डॉ घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी सुन व नातवंडे असा परिवार आहे. एस टी शिवाजीनगर डेपो मधुन कंट्रोलर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यावर कवठे ता. वाई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील अनेक लोक, प्रतिष्ठित नागरिक, आणि मान्यवर उपस्थितीत होते. त्यांच्या निधनाने कवठे गावामध्ये दुःखाची लहर पसरली आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











