वेळे येथील शासनमान्य रास्त भाव धान्य दुकानाची पुणे विभागाचे उपायुक्त दिनेश तावरे यांनी केली तपासणी व पाहाणी

धान्य साठा, ई-पॉस प्रणाली व गुणवत्तेची सखोल पडताळणी - गैरप्रकार करणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा
Wrestling shop investigation, Pune deputy commissioner, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पारदर्शकपणे पोहोचत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त दिनेश तावरे यांनी वेळे येथील शासनमान्य  रास्त भाव धान्य दुकानास  भेट देऊन सखोल  तपासणी व पाहणी केली.

तपासणीदरम्यान उपायुक्त दिनेश तावरे यांनी दुकानातील उपलब्ध धान्य साठ्याची प्रत्यक्ष मोजणी करून ऑनलाइन नोंदींशी पडताळणी केली. ई-पॉस (e-POS) मशीनचे कामकाज, बायोमेट्रिक प्रणाली, धान्याचा दर्जा तसेच दुकानाबाहेरील दर्शनी भागात लावलेले दरफलक आणि साठा फलक यांची त्यांनी बारकाईने तपासणी केली. 

तपासणीदरम्यान दुकानात धान्य घेण्यासाठी आलेल्या शिधापत्रिकाधारकांशी उपायुक्तांनी थेट संवाद साधला. "तुम्हाला दरमहा नियमितपणे आणि पूर्ण वजनाने धान्य मिळते का? दुकानदाराकडून गैरवर्तन होते का?" असे प्रश्न विचारून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

​यावेळी बोलताना उपायुक्त दिनेश तावरे यांनी स्पष्ट केले की, "गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या धान्य योजनेत कोणताही हलगर्जीपणा किंवा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. सर्व रेशन दुकानदारांनी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करून नियमानुसारच धान्य वाटप करावे. तक्रारी आढळल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

यावेळी  पुरवठा निरीक्षण अधिकारी  समीर मिर्झा, सरपंच सौ. अर्चना गायकवाड, उपसरपंच सौ. सिंधू अर्जुन ढमाळ, ग्रामपंचायत सदस्य  दिपक पवार,ग्रामपंचायत अधिकारी  संदीप सावंत, ग्रामरोजगार सहायक  प्रशांत शिंदे, महेंद्र सोनावणे तसेच वेळे ग्रामस्थ उपस्थित होते.

-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !