पत्रकारांच्या पाल्यांसाठी चंद्रकांतदादा पाटील शिष्यवृत्ती - प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून करमाळ्यात कु. ऋतुजा नितीन झिंजाडे हिला बी.ए.एम.एस. शिक्षणासाठी ४० हजारांची शिष्यवृत्ती

ना.चंद्रकांतदादा यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून प्रतबिंब प्रतिष्ठान  कार्यरत
Educational student fund for journalist child, Minister Chandrakant Patil, Raja Mane, digital media sampadak patrakar Sangh, digital media editor journalist association, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
करमाळा - पत्रकारांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल महाराष्ट्रातील पत्रकारांच्या ६२ पाल्यांना एकूण १९ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. पत्रकारांच्या कुटुंबांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

पत्रकारिता करताना अनेक पत्रकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. समाजातील विविध घटकांच्या समस्या मांडणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे पत्रकारांच्या मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी मोठे आर्थिक पाठबळ मिळाले असून त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे.डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकारांच्या हितासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उन्नतीसाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत मिळवून देत त्यांनी पत्रकारांप्रती आदराची आणि आपुलकीची भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम पत्रकारांसाठी नवसंजीवनी ठरत असून राजा माने साहेबांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करमाळा तालुक्यात प्रथमच कु ऋतुजा नितीन झिंजाडे हिला बी.ए.एम.एस. वैद्यकीय शिक्षणासाठी ४० हजार रुपयांची शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला. मुंबई येथे जात असताना  टेंभुर्णी येथे प्रताप चिंतामण यांच्या फार्म हाऊसवर अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने  यांच्या हस्ते ऋतुजाचे वडील नितीन झिंजाडे यांच्याकडे चाळीस हजार रुपयांचा शिष्यवृत्तीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे ऋतुजाच्या वैद्यकीय शिक्षणाला मोठे आर्थिक बळ मिळाले असून झिंजाडे परिवाराने या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ऋतुजाला मिळालेल्या शिष्यवृत्तीबद्दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी आणि करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांचे झिंजाडे परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके, ग्रामपंचायत सदस्य  पत्रकार रघुनाथ जाधव तसेच प्रगतिशील बागायतदार प्रताप चिंतामन उपस्थित होते.

पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी १९ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम आणि करमाळ्यात कु .ऋतुजा नितीन झिंजाडे हिला मिळालेली ४० हजार रुपयांची मदत ही पत्रकारांच्या कुटुंबांप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारी आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार, प्रतिबिंब प्रतिष्ठानचे कार्य आणि राजा माने साहेबांचे नेतृत्व यामुळे पत्रकारांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी नवी आशा मिळाली आहे.

-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !