दिवाळीच्या हंगामात वाई एसटी आगाराच्या उत्पन्नात भरारी! प्रवाशांचा एसटीला उत्स्फूर्त प्रतिसाद

योग्य नियोजन आणि ज्यादा बसेसमुळे दोन दिवसांत ३२ लाखांहून अधिक उत्पन्न
MSRTC earning highest record, wai St depot, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाई आगाराने केलेल्या योग्य नियोजनाला यश आले आहे. विविध मार्गांवर तसेच लांब पल्ल्याच्या मार्गांवर ज्यादा बसेस सोडून प्रवाशांची वाहतूक केल्याने आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या तसेच परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन वाई आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा बसेसचे नियोजन केले होते. सातारा, पुणे, मुंबई यांसह विविध मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

आगाराच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेच्या दिवशी सुमारे २४ हजार किलोमीटर बससेवा चालविण्यात आली. या दिवशी तिकीट विक्रीतून सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर एकूण उत्पन्न १६ लाख १६ हजार रुपयांवर पोहोचले. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजीही सुमारे २४ हजार किलोमीटर बससेवा चालविण्यात आली. या दिवशी तिकीट विक्रीतून १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर एकूण उत्पन्नात वाढ होऊन ते १६ लाख ३८ हजार रुपयांवर पोहोचले.

अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसांत वाई आगाराने एकूण ३२ लाख ५४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा अंदाज घेऊन केलेले नियोजन, ज्यादा बसफेऱ्या आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे दिसून येत आहे. 

दररोज सुमारे २० हजार किलोमीटर बससेवा चालविणाऱ्या वाई आगाराने सणासुदीच्या काळात त्यामध्ये वाढ करून प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, योग्य नियोजनाच्या जोरावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून उत्पन्नवाढ साधता येते, हे वाई आगाराने दाखवून दिले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !