श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्री शिवछत्रपती गोरक्षा समितीचा गोसेवेचा स्तुत्य उपक्रम

वसुबारसनिमित्त करुणा मंदिर गोशाळेला चारा वाटप
Fodder for cows, Shiv pratishthan Hindustan, Bhide guruji, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - वसुबारस या सणाचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लाखानगर, डांगे कॉलनी विभाग, वाई तालुका, महाबळेश्वर आणि आद्यगोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेला चारा वाटप करण्यात आले. गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत गोसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी गोरक्षणाच्या कार्यात वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करणारे ॲड. दिनेश धुमाळ, ॲड. ऋषिकेश सकुंडे, अथर्व पाटील, संतोष काळे आणि हिंदुराव गोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला मानद पशुकल्याण अधिकारी अभय शिंदे आणि सिद्धार्थ लाखे यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, गोरक्षक उपस्थित होते. गोमातेचे संरक्षण, संगोपन आणि गोशाळांना आवश्यक सहकार्य मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
 
वसुबारसच्या निमित्ताने केवळ परंपरेचे पालन न करता प्रत्यक्ष कृतीतून गोसेवेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि पशुकल्याणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !