लांब उडीत सोहम वाडकर तालुक्यात प्रथम

वयगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
First in the long jump competition,Soham Wadkar, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)

स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत वयगाव शाळेच्या सोहम विजय वाडकर याने उल्लेखनीय कामगिरी करत मोठ्या गटातील लांब उडी या क्रीडा प्रकारात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या दैदीप्यमान यशामुळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सोहमने आपल्या जिद्द, मेहनत आणि सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याला संतोष वाकचौरे आणि ललिता खंडागळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल पंचायत समिती सभापती पै. विक्रांत डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव शिंदे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, विस्ताराधिकारी साईनाथ वाळेकर, केंद्रप्रमुख विशाल गिरी, जिल्हा क्रीडा समन्वयक शिवाजी निकम, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नलावडे, शाळा व्यवस्थापन समिती वयगाव तसेच ग्रामस्थ मंडळ वयगाव यांनी सोहमचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही अफाट क्रीडा गुणवत्ता असून योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते निश्चितच मोठी भरारी घेऊ शकतात, हे सोहमने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही सोहमने अशीच चमकदार कामगिरी करावी, यासाठी त्याला सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

        ----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !