शाळेच्या विकासासाठी सहा शेतकऱ्यांचे दातृत्व - वडिलोपार्जित जमीन केली विनामोबदला दान

अतिदुर्गम जोर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शाळा उपक्रमाला बळ; शिक्षणासाठी शेतकऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Strengthening the 'Ideal School' initiative, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला बळ देण्याच्या उदात्त हेतूने वाई तालुक्यातील अतिदुर्गम जोर (जोरवाडी) गावातील सहा कष्टकरी शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित मालकीची जमीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी विनामोबदला दान केली आहे. शेतकऱ्यांच्या या दातृत्वामुळे गावातील शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाई तालुक्याच्या शेवटच्या टोकाला, वाई शहरापासून सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जोर गावाला भौगोलिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोरचा शासनाच्या आदर्श शाळा उपक्रमांतर्गत विकास व्हावा, या उद्देशाने गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.

तुकाराम चिमाजी यादव, किसन बाबुराव यादव, चंद्रकांत राजू यादव, बबन रामा कोळी, धोंडीबा रामा कोळी आणि सदू राजू यादव या सहा शेतकऱ्यांनी स्वतःची वडिलोपार्जित शेतजमीन शाळेसाठी कोणताही मोबदला न घेता अर्पण केली. या जागेच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेली बक्षीसपत्राची नोंदणी प्रक्रिया वाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पूर्ण करण्यात आली. संबंधित जमीन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेसाठी वाईचे दुय्यम निबंधक ओंकार पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणराव घोलप, शिक्षण अधिकारी मोरे, विस्तार अधिकारी तथा जोर ग्रामपंचायतीचे प्रशासक राहुल हजारे, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल संकपाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका शुक्ला भिलारे-पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

तसेच शाळेतील शिक्षिका त्रिवेणी पिंपळे, सुप्रिया मुटके, शिक्षक राहुल शेळके, संजय निकम, सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी नारायण सपकाळ, चिमाजी यादव, दस्तलेखन व नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करणारे कळंभे गावचे माजी उपसरपंच व राष्ट्रीय उत्कृष्ट उपसरपंच पुरस्कारप्राप्त प्रकाश बाबर, बॉण्ड रायटर संतोष शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

'आमच्या पुढच्या पिढीने शिक्षण घेऊन गावाचे नाव मोठे करावे, शाळेचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. या शैक्षणिक कार्यात आमचाही खारीचा वाटा असावा,' ही भावना या शेतकऱ्यांच्या कृतीतून व्यक्त झाली.

सामान्य शेतकरी कुटुंबातील या दानशूर व्यक्तींनी स्वतःच्या मालकीची जमीन शाळेसाठी देऊन शिक्षणाच्या पवित्र कार्याला हातभार लावला आहे. त्यांच्या या योगदानामुळे जोर गावातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
    
शेतकऱ्यांच्या या अनमोल योगदानाबद्दल पंचायत समितीचे अधिकारी, शिक्षण विभाग, महसूल व नोंदणी विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन आणि शिक्षकांनी त्यांचे आभार मानले. जमिनीचे दान करून शिक्षणाच्या माध्यमातून गावाच्या भविष्याची पायाभरणी करणाऱ्या या सहा शेतकऱ्यांचा आदर्श इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
        
           -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !