मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्द टाकणार का? साताऱ्यातील महायुतीचे नेते तो पाळणार का?

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी राजकारण टोकाला
DCC Bank election, chairman, Jayakumar Gore, Shivendra Raje Bhosle, CM Devendra fadnavis, shambhuraje Desai, Udayan Raje Bhosle, makrand Patil, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदावरून साताऱ्यातील महायुतीचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या सत्तेच्या गणितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावायला लावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जिल्हा बँकेसाठी शब्द टाकणार का?आणि त्यांनी टाकलेला शब्द साताऱ्यातील महायुतीचे नेते पाळणार का?,हा महत्त्वाचा राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणातील घडामोडींचे परिणाम राज्याच्या राजकारणावर झालेले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेतही काही वेगळे घडल्यास त्याची किंमत भविष्यात राज्याच्या राजकारणातही मोजावी लागू शकते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाचा विषय केवळ सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.

मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावायला लावली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ते जिल्हा बँकेसाठी शब्द टाकणार का आणि तो शब्द साताऱ्यातील महायुतीचे नेते पाळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

त्यामुळे चेअरमनपदाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असून, जिल्हा परिषदेच्या राजकारणाची पुनरावृत्ती जिल्हा बँकेत होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

मंत्री जयकुमार गोरेंची जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची महत्त्वाकांक्षा अन् महायुतीतील नाराजी
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना झालेली धक्काबुक्की, तसेच भाजपविरोधात महायुतीच्या घटक पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी, याचे पडसाद आता जिल्हा बँकेच्या राजकारणात उमटण्याची चर्चा आहे. मंत्री जयकुमार गोरे यांची जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाबाबतची महत्त्वाकांक्षा आणि जिल्हा परिषदेत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती जिल्हा बँकेतही होऊ शकते, अशी धास्ती महायुतीतील काही कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महायुतीतील नेते जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !