जिथे बार्शी, तिथे सरशी- बार्शी तालुक्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना भरघोस प्रतिसाद

डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला होणार फायदा
Teachers' Constituency Election, Solapur, Barshi, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, बार्शी प्रतिनिधी 

बार्शी– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ‘ज्ञानयात्री’ म्हणून ओळख निर्माण झालेले डॉ. बी. पी. रोंगे सर हे बार्शी तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या भेटींना शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. साधारण दिड वर्षभरापासून डॉ. बी.पी.रोंगे सरांनी पुणे विभागात असणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील शाळा- महाविद्यालयांना व पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत.

ज्याप्रमाणे स्वेरीतील विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होत आहे त्याचप्रमाणे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे भविष्यही उज्वल झाले पाहिजे. डॉ. रोंगे सरांच्या रूपाने पुणे विभागाला अभ्यासू आमदार मिळणार असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. यावेळी विभागातील शिक्षकांनी डॉ. रोंगे सरांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे, हेच वाढत्या प्रतिसादावरून दिसून येते.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. यनिमित्ताने सर्वत्र डॉ. रोंगे सरांचे भव्य स्वागत केले जात आहे. प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात मात्र कमालीची आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. रोंगे सरांची मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे.

एकूणच डॉ. रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आहे तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून सुरू झालेल्या या काळात प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु असून त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबाबत डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. 

एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील शाळा- महाविद्यालयांना भेटी देऊन डॉ. रोंगे सरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी जय जगदंबा सर्जापूर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांची भेट घेतली. डॉ रोंगे सरांनी शेळगाव ज्युनिअर कॉलेज शेळगाव, जनाबाई जाधव प्रशाला राळेरास, अर्णव शैक्षणिक संकुल वैराग इतर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. या भेटी दरम्यान बोलताना ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सर म्हणाले की ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी व समस्या आहेत.

 त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण सेवा करण्याची संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाही त्यांनी दिली. या कारणांमुळे सर्वत्र ज्ञायात्री डॉ. रोंगे सरांना भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. आमदार होण्यापूर्वीच सरांनी कांही प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे डॉ. रोंगे सरांकडे पुणे विभागातील शिक्षक आशेने पाहत आहेत, हे मात्र नक्की जाणवते.
       -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !