कौस्तुभ गावडेंची सोलापूरात दमदार मोर्चेबांधणी,माळशिरसच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक
शिक्षकांच्या एकजुटीचे बळ पाठीशी!
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-महायुतीचे उमेदवार 'शिक्षकमित्र' कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. माळशिरस येथे पार पडलेल्या महायुतीच्या प्रचारसभेला शिक्षक, पदवीधर बंधू-भगिनी आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला!
विशेष म्हणजे, या सभेच्या निमित्ताने भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले. माजी आमदार राम सातपुते, आमदार अमोल जावळे, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे यांच्यासह महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत एकजुटीचे बळ कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी उभे केल्याचे दिसून आले.
केवळ सभांपर्यंतच मर्यादा न ठेवता, कौस्तुभ गावडेंनी माळशिरसमधील गोपाळराव देव प्रशाला, आगाशे कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांनी शिक्षकांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रापुढील आव्हानांवर सविस्तर चर्चा केली. शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठावर प्रभावीपणे वाचा फोडण्याचा निर्धार त्यांनी या दौऱ्यातून व्यक्त केला आहे.
या महायुतीच्या जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील रंगत आता चांगलीच वाढली आहे!
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











