पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीसाठी कटिबद्ध, रिक्त पदांची १०० टक्के भरती करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे कौस्तुभ गावडेंचे सुतोवाच

दरवर्षी TAIT परीक्षा घेऊन शाळांना नियमित शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार
Kaustubh gawade, teachers requirement, Solapur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक, नियमित आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, भरती प्रक्रियेतील विलंबामुळे शाळांमध्ये शिक्षकांची पदे दीर्घकाळ रिक्त राहत असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियमित शिक्षक भरती होण्यासाठी आणि संस्थांमधील रिक्त पदे १०० टक्के भरण्यासाठी आपण शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर येथील प्रचार दौऱ्यात दिले. सोलापूर मधील अनेक शाळा, संस्थांमधील शिक्षकांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.

राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक भरती पवित्र प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) दरवर्षी घेऊन, संबंधित संस्थांमधील मंजूर रिक्त पदांनुसार भरती प्रक्रिया राबविणे अपेक्षित आहे. २०१७ मध्ये सुरू झालेली भरती प्रक्रिया २०२२ मध्ये पूर्ण झाली, तर २०२२ मधील भरती प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याने शिक्षक भरतीच्या संथ गतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भरती प्रक्रियेला अपेक्षित नियमितता नसल्यामुळे शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे वेळेत भरली जात नाहीत. दरम्यान, नियमित वयोमानानुसार शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने उपलब्ध शिक्षकांवरील अध्यापनाचा भार वाढत आहे. अनेक ठिकाणी आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्दिष्टासमोर आव्हान उभे राहत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर अनेक महिने शिक्षक भरतीची प्रतीक्षा करावी लागणे ही शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्यासाठी आणि शैक्षणिक सातत्य टिकून राहण्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी भरतीचे वेळापत्रक निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

याबाबत भूमिका स्पष्ट करताना कौस्तुभ गावडे म्हणाले की, शिक्षक भरती ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित बाब आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रत्येक शाळेत आवश्यक संख्येने पात्र आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे TAIT परीक्षा दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावी, पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात यावी आणि संस्थांमधील पात्रतेनुसार रिक्त असलेली शिक्षक पदे १०० टक्के भरण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्यात यावी, यासाठी आपण आग्रही राहणार आहोत.

शिक्षक भरतीतील विलंब दूर करून शाळांना वेळेत शिक्षक उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि शिक्षणव्यवस्थेतील गुणवत्तावाढीला चालना देणे, ही आपली प्राथमिकता असल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले. शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांच्या हितासाठी पवित्र पोर्टलची कार्यपद्धती अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
       -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !