सहकारी संस्था टिकली तरच शेतकरी टिकेल

प्रमोद शिंदे: नविन विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
Inauguration of the new divisional office, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सहकाराचे मंदिर हे सभासदांच्या हक्काच्या मालकीचे असते, याचे पावित्र्य राखण्याचे काम सभासदांचे असते. सहकारामध्ये सभासदांना हक्काने प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. खाजगी कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न किंवा काही अडचणी विचारण्याचा अधिकार नसतो. अशावेळी शेतकऱ्यांची होणारी गळचेपी व नाहक होणाऱ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच आपली संस्था बंद असल्यास शेतकऱ्यांना दुसरे कारखाने काय किंमत देतात, याची कल्पना आपल्या सर्वांना आहेच. त्यामुळे सहकारी संस्था टिकली, तरच शेतकरी टिकेल, अशी भावना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे यांनी व्यक्त केली.

शहाबाग, ता. वाई येथील वाई-१, वाई-२, पसरणी, मेणवली व खानापुर अशा पाच गटांच्या नविन विभागीय कार्यालयाचे उदघाटन प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जनता अर्बन बँकेचे संचालक महेंद्र जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, शिवाजी जमदाडे, प्रकाश धुरगुडे यांची उपस्थिती होती.

प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, किसन वीर व खंडाळा कारखान्यावर तोडणी यंत्रणा दाखल झालेली असुन ऊसाच्या तोडी देण्यासही सुरूवात झालेली आहे. ऊस उत्पादकांनी मागील चार वर्षांमध्ये जो विश्वास नामदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळावर दाखविलेला आहे, तोच विश्वास या गळित हंगामामध्ये दाखवुन आपला परिपक्क झालेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला द्यावा. शेतकऱ्यांनी ऊस दराची चिंता करू नये, इतर कारखान्यांप्रमाणेच दर दिला जाईल, याबाबत शाश्वत रहावे. या पाच गटाचे विभागीय कार्यालय झाल्याने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा त्रास कमी होणार असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांना हवी असणारी माहिती या विभागीय कार्यालयात उपलब्ध होणार असल्याचेही श्री. शिदे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास मार्केट कमिटीचे संचालक रमेश गायकवाड, शहाबागचे माजी सरपंच यशवंत जमदाडे,  मेणवलीचे माजी उपसरपंच संजय चौधरी, मानसिंग वाघ. वसंत जमदाडे, विक्रम कुदळे, सोनबा ससाणे, संजय राऊत, दिपक लोळे, गणपत शिंदे, वैभव बोधले, गणेश जमदाडे, संतोष राजपुरे, सचिन जमदाडे, संजय करमाळे, अजित पिसाळ, योगेश पोळ, सुधीर जमदाडे, प्रदिप नायकवडी, संतोष जंबुरे, प्रताप जमदाडे, निलेश नेवसे, श्रीकांत बोधले, विकास जमदाडे, अमित पवार, ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
        ----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !