डोंबाळवाडीचे महेश धायगुडे पाटील यांची सोलापूर जिल्हा गटसचिव संघटनेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

कार्यतत्परता, प्रामाणिकपणा आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर मिळवले यश; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
Selection of the Group Secretary Director of the organization, Solapur, malshiras, shivshahi news .

शिवशाही वृत्तसेवा,नातेपुते, (प्रतिनिधी राहुल तनपुरे)

माळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कार्यक्षम सचिव महेश धायगुडे पाटील यांची सोलापूर जिल्हा गटसचिव संघटनेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे डोंबाळवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महेश भाऊ धायगुडे पाटील यांनी आपल्या कामातील तत्परता, प्रामाणिकपणा, पारदर्शक कार्यपद्धती आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीच्या जोरावर सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कार्यक्षमतेच्या बळावर त्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या आजवरच्या कार्याची पोचपावती मानले जात आहे.
डोंबाळवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आजी-माजी चेअरमन, संचालक मंडळाचे सदस्य, तसेच डोंबाळवाडी व हनुमानवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने महेश धायगुडे पाटील यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक जाणीवा, कामाप्रती असलेली निष्ठा आणि सहकार क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर बिनविरोध निवड झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सहकार क्षेत्रातील कार्याला मिळाली मान्यता!
सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी कार्यतत्परता, अनुभव व समन्वयाची भूमिका महत्त्वाची असते. महेश भाऊ धायगुडे पाटील यांनी आपल्या कामातून हीच कार्यसंस्कृती जपली आहे. उच्चशिक्षित लेखापरीक्षकांसह सहकार्याने काम करणे, कामात अचूकता राखणे आणि वेळेचे महत्त्व ओळखून जबाबदाऱ्या पार पाडणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात.
त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची सोलापूर जिल्हा गटसचिव संघटनेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सामान्य कुटुंबातून पुढे येत स्वकर्तृत्वाच्या जोरावर सहकार क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवता येते, याचे महेश धायगुडे पाटील हे उत्तम उदाहरण असल्याची भावना त्यांच्या हितचिंतकांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल छगन रूपनवर, आप्पासाहेब रूपनवर, संतोष रूपनवर, संदिप वायसे, रोहन वायसे, वायसे डॉक्टर, ओम पाटील, नाथा पाटील, नितीन चिपकुले, मोतिलाल जैन, शिवेंद्रराजे हुंबे, राजेंद्र वायसे सर, मारुती वायसे आणि सचिन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, सहकारी कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महेश भाऊ धायगुडे पाटील यांच्या या यशामुळे डोंबाळवाडी गावासह संपूर्ण परिसराचा गौरव वाढला असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात सहकार क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
         -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !