ना.मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नांना यश; जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सवलतींचा मार्ग खुला, पंचनाम्यांचे तातडीचे निर्देश
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण, त्यांच्या अडचणींची जाणीव आणि शासनस्तरावर त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे पाहिले जात आहे. राज्य शासनाने ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश झाल्याने जिल्ह्याच्या दुष्काळी मदतीच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. यापूर्वी ट्रिगर-१ अंतर्गत सातारा, माण, खटाव, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर या सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला होता.
त्यानंतर ट्रिगर-२च्या निकषांनुसार राज्यातील आणखी ३९ तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त तालुक्यांची एकूण संख्या ३०४ झाली. सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचाही समावेश झाल्याने दुष्काळी उपाययोजनांचा लाभ जिल्हाभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न केले.
त्यांच्या माध्यमातून उर्वरित 6 तालुके दुष्काळग्रस्त झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्याला दिलासा मिळाला.
ट्रिगर-१ अंतर्गत सातारा, माण, खटाव, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर या सहा तालुक्यांचा समावेश झाला होता. ट्रिगर-२च्या निर्णयामुळे उर्वरित तालुक्यांचाही समावेश होऊन जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या विषयाला महत्त्वपूर्ण चालना मिळाली. आता पीक नुकसानीचे पंचनामे आणि शासनाच्या निकषांनुसार सवलतींची अंमलबजावणी यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











