आयुष्य एकदाच आहे, स्वसुरक्षा महत्वाची - व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे

'किसन वीर' तर्फे वाहनांना रिफ्लेक्टरचे वाटप
Reflector for tractor, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

जीवन अनमोल असुन, आयुष्याला वन्स मोअर मिळत नाही. त्यामुळे ऊस तोड वाहतुक करणाऱ्या वाहनाच्या चालकांनी सावधानता बाळगुन अपघात होणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. याबाबत कारखाना व्यवस्थापन कायमच दक्षता बाळगत असते. त्यामुळेच कारखान्यावरील सर्व वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात येत असल्याचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

किसन वीर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर मुंगळा गाडी, बैलगाडी या वाहनांना व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भुईंज महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ए. आर. कवठेकर, कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, कार्यकारी संचालक उत्तम पाटील यांच्या हस्ते रिफ्लेक्टर बसविण्यात आले.

प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाल्यामुळे कारखान्याकडे ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर मुंगळा गाड्यांची वाहतुक ही दिवस-रात्र सुरू असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांना रिफ्लेक्टर बसविल्यामळे वाहने पुढे असल्याचे दिसुन येत असल्याने अपघात होण्याची शक्यता टाळण्यास मदत होती. वाहन मालकांनीही आपली वाहने सुरक्षित येण्याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.

यावेळी वाहतुक पोलीस जी. जी. बाकले, प्रशांत शिंदे, राजेंद्र भोसले, सुधीर गायकवाड, अमोल बाबर, विकास शिंदे, सोपान सावंत, शुभम कांबळे, सागर भिंताडे मुकादम विजय आसबे, संजय पवार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी, वाहन मालक उपस्थित होते.
          -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !